इंदापूर : आठ एकर ऊस जळाला | पुढारी

इंदापूर : आठ एकर ऊस जळाला

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील अवसरी गावात शुक्रवारी (दि. 18) अंदाजे आठ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ही आग एवढी मोठी होती, की सर्वत्र आगीचे लोट आणि धूर दिसत होता. स्थानिक नागरिक ऊसतोड मजूर आणि इंदापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्रणेच्या माध्यमातून आगीवर वेळीच नियंत्रण आणल्याने मोठे नुकसान टळले आहे.

दुपारच्या दरम्यान अवसरी गावातील सौरभ प्रकाश गायकवाड, सुरज प्रकाश गायकवाड व कल्याण शिंदे यांच्या 13 महिने पूर्ण झालेल्या उसाला आग लागली. ही आग नेमकी कशाने लागली, याचे कारण मात्र समजलेले नाही. मागील वर्षी देखील याच परिसरातील ऊस जळाला होता.

Back to top button