फुरसुंगी : स्मशानभूमीतील खिडक्या, गटारीच्या जाळ्यांची चोरी | पुढारी

फुरसुंगी : स्मशानभूमीतील खिडक्या, गटारीच्या जाळ्यांची चोरी

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा : शेवाळवाडी गावातील स्मशानभूमीतील खिडक्या व गटारीवरील जाळ्या अज्ञात चोरट्यांनी काढून नेल्या आहेत. महापालिकेने तातडीने याठिकाणी नव्या जाळ्या बसवून रहिवाश्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी शेवाळवाडी स्मशान-भूमीत असलेल्या खिडक्या व पाणी वाहून जाण्यासाठी असलेली गटारे यांच्या जाळ्या उचकवटून चोरून नेल्या आहेत.

त्यामुळे स्मशानभूमीत येणार्‍या रहिवाश्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गटारीवर जाळी नसल्याने या ठिकाणी अडखळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या ठिकाणी नव्या जाळ्या बसविण्याची मागणी नागरिकांसह माजी सरपंच राहुल शेवाळे यांनी केली आहे.

Back to top button