खेड, शिरूर, आंबेगावातील 36 गावे दुष्काळमुक्त करणार; जयप्रकाश गोरे यांची ग्वाही

'मुख्यमंत्र्यांना भेटून हा भाग दुष्काळ मुक्त करू'
Pune News
खेड, शिरूर, आंबेगावातील 36 गावे दुष्काळमुक्त करणार; जयप्रकाश गोरे यांची ग्वाहीPudhari
Published on
Updated on

वाफगाव: पुणे जिल्ह्यातील धरणाचे पाणी इतर जिल्ह्यांना दिले जाते. परंतु जिल्ह्यातीलच खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यांतील 36 गावे दुष्काळग्रस्त आहेत. या गावांना धरणाचे पाणी मिळाले पाहिजे. या गावांचा दुष्काळ हटवण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेऊ. मुख्यमंत्र्यांना भेटून हा भाग दुष्काळ मुक्त करू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिली.

कनेरसर (ता.खेड) येथे गुरुवारी (दि. 24) झालेल्या 36 गावच्या पाणी परिषदेत ते बोलत होते. दुष्काळी भागातून आलो असल्याने दुष्काळी परिस्थितीची जाण आहे. त्यामुळे या गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या सूचना या वेळी गोरे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. या परिसरात पाणी फिरण्यासाठी चासकमान, कळमोडी व डिंभे धरणातील मूळ फेरवाटपाला धक्का न लावता या धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करण्याची आग्रही भूमिका या वेळी गोरे यांनी मांडली.

Pune News
PM Awas yojana: महाराष्ट्र करणार पहिले बेघरमुक्त राज्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आमदार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्याच्या दुष्काळी भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी कळमोडीचे पाणी लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी केली. बंद असलेली चाळीस गाव पाणी योजना व इतर विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी गोरे यांच्याकडे केली.

याप्रसंगी पाणी परिषदेचे निमंत्रक हेमंत हरारे, जयप्रकाश वळसे पाटील व सरपंच संतोष गोरडे यांनी पाणी परिषद आयोजित करण्याबाबतचा उद्देश सांगितला. या वेळी विविध गावांच्या सरपंचांनी पाणी प्रश्न लवकर सोडवण्याबाबत आक्रमक भूमिका मांडल्या.

Pune News
pahalgam attack |पहलगाम हल्ल्यानंतर बैसरन खोऱ्यात NIAचा तळ ठोकून तपास

या पाणी परिषदेला ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दोंडे, तहसीलदार प्रशांत बेंडसे, हेमंत हरारे, नायब तहसीलदार राम चोबे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, कनेरसरचे सरपंच सुनीता केदारी, वरुडे गावच्या सरपंच सुनीता पडवळ, गुळाणीचे सरपंच माऊली ढेरंग, वाफगावचे सरपंच नितीन लंगोटे, माजी सरपंच अजय भागवत, चिंचबाईवाडीचे सरपंच संतोष गार्डी , गाडकवाडीचे सरपंच वैभव गावडे आदी उपस्थित होते. या वेळी भाजपा व विविध संस्थांच्या वतीने गोरे यांचा सत्कार करण्यात आला. परिसरातील सरपंच व पदाधिकार्‍यांनी मंत्र्यांना विविध मागण्यांची निवेदने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news