सीतरंग चक्रीवादळ आज वेग घेणार ; भारतीय किनारपट्टयांना सावधानतेचा इशारा | पुढारी

सीतरंग चक्रीवादळ आज वेग घेणार ; भारतीय किनारपट्टयांना सावधानतेचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला थायलंड ने असे (सितरंग) नाव दिले असून रविवारी सकाळीच त्याने वेग घेतला. सोमवारी याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याने भारतीय किनारपट्ट्याना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई, पुणे शहरासह महाराष्ट्रातुन मान्सून परतीला गेल्याची अधिकृत घोषणा रविवारी हवामान विभागाने केली. त्यामुळे येथून पुढे पाऊस पडलाच तर अवकाळी स्वरूपाचा असेल.

बंगालच्या उपसागरात पूर्वमध्य भागात 22 रोजी शनिवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. शनिवारी रात्री त्याचा वेग ताशी 60 ते 70 किमी इतका झाला व रविवारी 22 रोजी सकाळीच त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. सोमवारी 23 रोजी त्याचा वेग तशी 110 किमी राहील त्यामुळे भारतीय किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राला धोका नाही..

हवामान विभागाने जाहीर केल्या प्रमाणे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिमाण होणार नाही.चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातच राहणार ते भारतीय किनार पट्ट्यात धडकणार नाही असा अंदाज आहे.मात्र या भागात जोरदार पाऊस पडेल.प्रामुख्याने ओडिशा व पश्चिम बंगाल च्या किनार पट्टीवर या चक्रीवडळाचा प्रभाव पडू शकतो.

सितरंग म्हणजे त्सुनामी..

बंगालच्या उपसागरात येणारे हे आजवरचे 169 वे चक्रीवादळ आहे. 2020 साली चक्रीवादळाची नावे ठेवली गेली. त्यात या वादळाला सीतरंग किंवा सित्रांग हे नाव दिले गेले. हे नाव थायलंड या देशाने दिले असून थाई भाषेत याला त्सुनामी असा अर्थ होतो. हे चक्रीवादळ रविवारी बांगलादेश किनार पट्टीवर धडकून त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे.

सोमवार, मंगळवारी भारतीय किनारपट्ट्यांना सतर्कतेचा इशारा

या चक्रीवादलाचा फारसा प्रभाव आपल्या देशात होणार नाही असा अंदाज असला तरीही ओडिशा, प. बंगाल किनारपट्टीला सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात २८ पर्यंत पावसाचा अंदाज नाही

संपूर्ण राज्यातून ओलावा कमी होणे म्हणजेच आपल्या राज्यातून 2022 च्या मान्सूनच्या समाप्तीचे प्रतीक आहे अशी घोषणा रविवारी हवामान विभागाने केली त्यामुळे मुंबई, पुणेसह संपुर्ण राज्यात दि 28 ऑक्टोबर पर्यन्त सर्वत्र कोरडे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Back to top button