बारामती : कऱ्हेला पूर, बारामती- मोरगाव रस्त्यावर पाणी | पुढारी

बारामती : कऱ्हेला पूर, बारामती- मोरगाव रस्त्यावर पाणी

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामतीसह पुरंदर तालुक्यात सोमवारी (दि.१७) रात्री मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नाझरे धरणातून मोठा विसर्ग सुरु आहे. कऱ्हा नदीला पूर आला आहे. अंजनगाव येथील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून बारामती- मोरगाव रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे.

मुसळधार पावसाने अंजनगाव- क-हावागज रस्त्यावर पाणी आले असून खबरदारीसाठी वाहतूक बंद केली गेली आहे. चव्हाण वस्तीवरील ३ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जळगाव कडेपठार येथील नदीकाठानजीकची २० कुटुंब स्थलांतरित करणेचे काम सुरू आहे. पुणे आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पथक मागविण्यात आले आहे. नाझरे धरणातून ३५००० क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माळेगावचे पोलिस निरीक्षक किरण अवचर, वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे गावोगावी जात परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

हेही वाचा :

Back to top button