पुणे : राज्यात पाच पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा | पुढारी

पुणे : राज्यात पाच पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पाच पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2003 च्या बॅचच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

भारतीय पोलीस सेवेत यावर्षी महाराष्ट्र संवर्गातून पाच अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये श्रीकांत धिवरे (एसपी सीआयडी पुणे युनिट), प्रकाश जाधव (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), विनय राठोड (पोलीस उपायुक्त झोन 5 ठाणे शहर), अश्विनी सानप (एसपी, सिक्युरिटी कॉर्पोरेशन) आणि  रश्मी करंदीकर (एसपी नागरी संरक्षण) यांना आयपीएस दर्जा मिळालाआहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. आयपीएसचा दर्जा ज्येष्ठतेनुसार मिळतो. सचोटी आणि चांगले  रेकॉर्ड आणि करिअर शीटवर एकही प्रतिकूल नोंद असून चालत नाही.

या अधिकाऱ्यांना हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये काही महिन्यांसाठी आयपीएस इंडक्शन कोर्स करावा लागणार आहे.

हेही वाचा

Back to top button