पिंपरी : महापालिकेकडून 40 सदनिकांना सील, आतापर्यंत थकबाकीदार 153 मिळकतींवर कारवाई

पिंपरी : महापालिकेकडून 40 सदनिकांना सील, आतापर्यंत थकबाकीदार 153 मिळकतींवर कारवाई
Published on
Updated on

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने आतापर्यंत थकबाकीदार 40 सदनिकांना सील लावले असून, निवासी व बिगरनिवासी असे एकूण 153 मिळकतीवर कारवाई केली आहे. सील करताच 58 नागरिकांनी 3 कोटी 58 लाख 71 हजार 339 रूपयांचा थकीत मिळकतकर भरला आहे.

शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणार्‍या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 आणि कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 अशा 31 हजार 971 मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्याच्याकडे तब्बल 631 कोटींची थकबाकी आहे. त्यासाठी कर संकलन विभागाने मिळकत सील करण्याची कारवाई तीव्र केली आहे. जप्ती केल्यानंतर वॉरंट फी, दंड अशी 15 टक्के रक्कम मालमत्ताधारकांना अधिक भरावी लागते. त्यामुळे नागरिकांनी जप्तीची कारवाई होण्याअगोदर कर भरणे अधिक फायद्याचे आहे. एकूण 153 मालमत्तांना सील लावण्यात आले आहे. सील लावताच 58 मालमत्ताधारकांनी त्वरित 3 कोटी 58 लाख 71 हजार 339 रूपयांचा भरणा केला.

21 दिवसांनी मिळकतीचा लिलाव

मालमत्ता सील करून जप्त केल्यानंतर काही जण थकीत मिळकतकर भरत नसल्याचे समोर आले आहे. मालमत्ता जप्त केल्यानंतर 21 दिवसांच्या आत कर न भरल्यास त्या मालमत्तेच्या जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी तत्काळ थकीत कर भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news