

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जंगली महाराज रोडवरील एका मोबाईल शॉपी व्यावसायिकाकडून व्याजासह 35 लाख रुपये वसूल करून प्रत्येक महिन्याला सात ते दहा हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी श्रीनाथ ऊर्फ शेरू परदेशी, रणजित परदेशी, चिराग जोशी, अथर्व देशपांडे, प्रवीण शेळके व त्यांचे इतर तीन साथीदार अशा आठ जणांविरुद्ध खंडणी, सावकारी अधिनियम, जिवे ठार मारण्याची धमकी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यातील प्रवीण शेळके याला अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवाजीनगर गावठाण येथील 35 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर 2012 ते 15 मे 2022 या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची जंगली महाराज रोडवर मोबाईल शॉपी आहे. आरोपींनी फिर्यादीला शस्त्राचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी मार्च 2016 पासून महिना दहा हजार रुपये खंडणी घेतली. दरम्यान फिर्यादींना सहा लाख रुपये व्याजाने देऊन तब्बल 35 लाख रुपये व्याजासह वसूल केले. तपास सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे करीत आहेत.
हेही वाचा