रेल्वेच्या पुणे विभाग व्यवस्थापक रेणू शर्मा यांची बदली | पुढारी

रेल्वेच्या पुणे विभाग व्यवस्थापक रेणू शर्मा यांची बदली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांची नुकतीच बदली झाली आहे. यासंदर्भातील आदेश रेल्वे मंत्रालयाने गुरूवारी काढले. आता रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक पदी इंदू राणी दुबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रेणू शर्मा या पुणे विभागीय रेल्वेच्या पहिल्या महिला व्यवस्थापक होत्या. त्यांनी करोनाच्या काळात चांगल्या पध्दतीने काम केले. कोरोनानंतर रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले. तसेच, हडपसर स्थानकाला टर्मिनल करण्याचे काम त्यांच्याच काळात झाले.

हेही वाचा

मुसळधार पावसाने डोंबिवली तुंबली; अवघ्या काही तासातच १०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद

शाहूवाडी- पन्हाळ्यातून महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा : अजित पवार

पुणे: देशासाठी खेळणाऱ्या राधिकाला दिला एका दिवसात पासपोर्ट

Back to top button