शाहूवाडी- पन्हाळ्यातून महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा : अजित पवार | पुढारी

शाहूवाडी- पन्हाळ्यातून महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी विधानसभा निवडणुकीत शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा, अशा सुचना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पवार यांनी राज्यातील शिंदे – भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी पावसाचे वातावरण बघून अजित पवार म्हणाले की, पाऊस आणि राष्ट्रवादीचा चांगला संबंध आहे. २०१९ च्या विधानसभा निवढणुकीत आम्ही विचाराधारा बाजूला ठेवून मार्ग काढला होता. कोरोनाच्या काळात एकत्र येऊन काम केले. आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढला होता. परंतु, सगळंच मला पाहिजे, या भाजपच्या वृत्तीतून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. पण जनतेने दिलेली जबाबदारी आम्ही चोखपणे पार पाडू. सत्ता येते आणि जाते. आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही.

अजित पवार यांनी यावेळी दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. तुमच्या भाषणातून लोक निघून गेली मग स्वत:हून ती कशी आली ? असा सवाल पवार यांनी केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. तर शिंदेच्या भाषणातून लोक उठून गेल्याने शिंदेंना भाषण थांबवावे लागले, अशी टीका पवार यांनी केली.

दसरा मेळाव्यासाठी लोकांना मुंबईत आणण्यासाठी एसटी बसेस बुक केल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. बसेससाठी १० कोटी कोठून आणले याचे उत्तर शिंदे यांनी द्यावे. महाराष्ट्रला कुठल्या दिशेने नेणार हे सांगायला पाहिजे होते. परंतु शिंदे आम्ही गद्दार नाही हेच वारंवार सांगत आहेत. शिंदे महागाईवर का बोलले नाहीत, असा सवाल करून भाजप सरकार बेरोजगारी वाढविणारे आहे. कारण राज्यातील २ लाखांचा प्रकल्प गुजरात गेला, असा निशाणा पवार यांनी साधला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button