काय सांगता ! ठाकरेंची लेक होणार शिंदेंची सून ? व्हायरल होते आहे ही लग्नपत्रिका | पुढारी

काय सांगता ! ठाकरेंची लेक होणार शिंदेंची सून ? व्हायरल होते आहे ही लग्नपत्रिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : उभ्या महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला विषय म्हणजे ठाकरे- शिंदेमध्ये रंगणारा कलगीतुरा. दसरा मेळावा असो की इतर कोणती बाब हे दोन्ही गट एकमेकांवर शाब्दिक शरसंधान करत असतात. पण एकीकडे हे दोन गट आमनेसामने येत असताना एका गावात मात्र ठाकरे- शिंदे सोयरीक जुळली आहे. ठाकरे- शिंदे सोयरीकीच्या व्हायरल होत असलेल्या लग्नपत्रिकेने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. जुन्नरमधील ठाकरेंची लेक आता शिंदेची सुन होणार आहे.

जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ. का. अनुराधा  यांच्या लग्नसोहळ्याची ही पत्रिका आहे. उद्या म्हणजे 8 ऑक्टोबरला हा विवाहसोहळा पार पडतो आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात ही पत्रिका मात्र लोकांचं मनोरंजन करणारी आहे.

Back to top button