तळेगाव दाभाडेमध्ये महावितरण अभियंत्यास मारहाण, एकाच्या विरोधात गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडेमध्ये महावितरण अभियंत्यास मारहाण, एकाच्या विरोधात गुन्हा दाखल
Published on
Updated on

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे स्टेशन शाखा कार्यालय क्रमांक 1 येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंत्याला मारहाण करत धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 19) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विक्रम गुलाब राठोड (वय 39, रा. ताथवडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ओंकार ऊर्फ विकी नवघणे (वय 25, रा. मनोहरनगर, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सहायक अभियंता विक्रम राठोड हे कार्यालयात आले असता आरोपी ओंकार नवघणे यांनी वाढीव वीजबिलासंदर्भात वाद घालायला सुरुवात केली. या आधीही अभियंता यांनी वीजबिलामध्ये दुरुस्ती करून त्यानुसार बिल भरण्यास सांगितले होते. परंतु, आरोपी यांनी वीजबिल भरले नसल्याने त्यांची वीज बंद करण्यात आली होती. याचा राग मनात धरत आरोपी नवघणे यांनी कार्यालयात घुसून राठोड यांना मारहाण केली. या घटनेचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news