शिवापूर वाडा येथील ज्वेलर्सवर दरोडा

उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक सचिन पाटील गणेश ज्वेलर्स या दुकानाची पाहणी करताना. (छाया : किरण दिघे).
उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक सचिन पाटील गणेश ज्वेलर्स या दुकानाची पाहणी करताना. (छाया : किरण दिघे).

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: शिवापूर (ता.हवेली) येथील शिवापूर वाडा येथील श्री गणेश ज्वेलर्स दुकानावर तिघांनी दरोडा टाकत सोने लुटून पोबारा केला आहे. या शेजारील सलूनच्या दुकानावरही चोरट्यांनी हल्ला केला. राजगड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिवापूर वाडा येथे रात्री साडेआठ वाजता श्री गणेश ज्वेलर्स मध्ये तीन जण शिरले. त्यांनी त्यांच्याकडील पिस्तुल दाखवून ज्वेलर्स मधील दोन जणांना बाजू हटीये असे म्हणत काऊंटर वरील पाच सोन्याचे डबे घेऊन शेजारी असलेल्या सलुनच्या दुकानात गोळीबार केला. त्यानंतर दुकानाच्या काचा हत्याराने फोडून दुचाकीवरुन पलायन केले.

काही मिनिटातच राजगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ तेथे आले. त्यांनी राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या तपासासाठी पथके रवाना केली. एकूण आरोपी सहा जण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी, श्वानपथकला पाचारण केले असून महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news