यवत पोलिसांच्या ताब्यातून फिल्मी स्टाईलने आरोपीचे पलायन | पुढारी

यवत पोलिसांच्या ताब्यातून फिल्मी स्टाईलने आरोपीचे पलायन

यवत/पाटस ; पुढारी वृत्तसेवा : यवत (ता.दौंड, जि.पुणे) ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात असणारा आरोपी आबासाहेब सुखदेव बागुल (रा. चिंचगव्हाण ता. चाळीसगाव जि. जळगाव) याला दौंड येथील न्यायालयीन कामकाजासाठी हजर करण्यात आले होते. कामकाजानंतर यवत पोलिस स्टेशनला घेऊन जात असताना पुणे सोलापूर महामार्गावरील वरवंड गावाच्या हद्दीत आरोपी लघुशंकेसाठी थांबला होता. यादरम्यान त्याने पोलिसांच्या तावडीतून फिल्मी स्टाईलने धूळ फेकत पळ काढला आहे.

ही घटना शनिवारी( दि २८) दुपारी ४ वाजता वरवंड पाटस शिवेवर असणाऱ्या कौठीचा मळा येथे घडली आहे..

आरोपी त्याच परिसरातील वरवंड हद्दीतीतल पाटील वस्ती या ठिकाणच्या उसात लपून बसला असल्याने ४० यवत पोलिसांचा ताफा या ठिकाणी शोध घेत आहेत. त्यांना परिसरातील नागरिक मदत करत आहेत.

आरोपी आबासाहेब बागुल याला शुक्रवार दि २७ रोजी यवत पोलिसांनी ऊस तोडणीसाठी मजूर देतो म्हणून 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या गावातून मोठ्या शिताफीने अटक केली होती..

यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थ यांच्या मदतीने आरोपीची शोध मोहीम सुरू आहे.

घटनास्थळी व या परिसरात या आरोपिकडून काही विपरीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फोज फाटा असून आरोपी ला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या परिसरातीळ प्रत्येक शेतात पोलीस जाऊन पाहणी करीत आहे..

या प्रकारची माहिती वरवंड परिसरातील नागरिकांना फोन द्यारे पोलीस पाटील किशोर दिवेकर यांनी आहवन केले आहे यातून नागरिकांची पोलिसांना मदत होत आहे..

तर पोलीस गाडीतील साऊंड द्यारे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा पोलिसांकडून दिला जात आहे..

Back to top button