शिवसेनेच्या चिन्हावर दावा योग्य नव्हे; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला | पुढारी

शिवसेनेच्या चिन्हावर दावा योग्य नव्हे; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

बारामती, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला आहे. वास्तविक एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नव्हे. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काॅंग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला, वेगळं चिन्ह घेतलं. आम्ही भांडत बसलो नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला टोला लगावला. संजय राठोड यांना मंत्रीपदाची संधी मिळाल्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले.

भाजप मित्रपक्षाला कधीही धोका देत नाही : देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारवरहीटीकास्त्र

बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यातील तसेच आंतरराष्ट्रीय घडामोंडीवर भाष्य केले. श्रीलंकेतील स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झाले. परिणामी तेथे असंतोष वाढायला लागला. जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे, ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातील नाही. काही वर्षातील आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उदभवली आहे, ती पाकिस्तानातही उदभवू शकते. आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे, याची नोंद देशातील राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. विशेषतः मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरणी पी. वरवरा राव यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

जिथे सत्ता केंद्रीत होते, तेथे हे प्रश्न निर्माण होतात. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय अशी शंका लोकांमध्ये आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही. पण आपण सावध राहण्याची गरज आहे. संसदेचे कामकाज चालविण्याची आस्था केंद्र सरकारमध्ये दिसत नाही. चर्चेचे मार्ग बंद केले जात असल्याची टीका पवार यांनी केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याची मोहिम राबवली जात आहे. त्या राष्ट्रीय कमिटीचा मी सदस्य आहे. हा पक्षीय कार्यक्रम नाही. परंतु आमचे त्याला सहकार्य असल्याचे पवार म्हणाले.

कोल्हापूर : एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबल जॉन तिवडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Back to top button