पुणे : खून प्रकरणी कोल्हापूरच्या एकाला जन्मठेप | पुढारी

पुणे : खून प्रकरणी कोल्हापूरच्या एकाला जन्मठेप

बारामती, पुढारी वृत्तसेवा : दारु पिण्याच्या व पैशाच्या कारणावरून सहकाऱ्याचा खून केल्याच्या खटल्यात सुरेश बापू कोळी उर्फ तराळ (मूळ रा. भैरववाडी, कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला येथील जिल्हा न्यायाधिश जे. एल. गांधी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोळी याने त्याचा सहकारी सुशांत अनिक वाडेकर (रा. कुरुंदवाड) याचा ४ सप्टेंबर २०१६ रोजी खून केला होता.

PV Sindhu vs  Michelle Li : बॅटमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधूची सुवर्ण पदकाला गवसणी, दुखापतग्रस्‍त असतानाही झुंझार खेळीचे प्रदर्शन

घटनेदिशी कोळी हा त्याचा सहकारी वाडेकर याच्यासह शशिकांत राजाराम भोई (रा. कुरुंदवाड) यांच्याकडील मासे घेऊन महिंद्रा मॅक्स पिकअप (एमएच ११ टी ७२७४) मधून नेरी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे पोहोचविण्यास गेले होते. तेथून ते परत येत असताना सिल्लोड-नेरी रस्त्यावर त्यांची जीप नादुरुस्त झाली. जीप दुरुस्त झाल्यानंतर ते परत कुरुंदवाडकडे जात असताना दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे त्यांच्यात दारु पिण्याच्या व पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यात कोळी याने जीपमध्ये ठेवलेला लोखंडी राॅड वाडेकर याच्या डोक्यात मारून त्याचा खून केला होता. मृतदेहाची ओळख पटू नये साठी सुशांतच्या अंगावरील रक्ताने माखलेला शर्ट फलटण येथे कालव्यात फेकून दिला होता. दौंड पोलिस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ब्रह्मपुरी तालुक्यातील घटना

या खटल्यात सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने कोळी याला भांदवि कलम ३०२ व २०१ अन्यये जन्मठेप व अडीच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा व पुरावा नष्ट केल्याबद्दल सहा महिने शिक्षा व पाचशे रुपये दड, दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा सुनावली.

या प्रकरणात दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अतुल भोसले, दप्तरी आर. एच. फाळके यांनी कामकाज केले. सहाय्यक उपनिरीक्षक राजाराम जगताप व एन. ए. नलवडे यांचे सरकार पक्षाला या कामी सहकार्य झाले.

कोळसा खाण घोटाळाप्रकरणी एच. सी. गुप्‍ता यांना ३, तर क्रोपा यांना २ वर्षांचा कारावास

Back to top button