Kalicharan Maharaj : हिंदुत्ववादी शिंदे सरकारला माझा आशिर्वाद | पुढारी

Kalicharan Maharaj : हिंदुत्ववादी शिंदे सरकारला माझा आशिर्वाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदे सरकारवर माझा आशीर्वाद आहे. जे हिंदूत्ववादी सरकार आहे त्याला माझा आशीर्वाद आणि पाठींबा आहे. शिवसेना कुणाचीही असो छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे आहेत. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्याने मला खूप आनंद झालेला आहे. सध्याच्या सत्ताधारी शिंदे गटाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण देशात हिंदुत्ववादी सरकार यावे अशी इच्छा प.पू. कालीचरण महाराज यांनी व्यक्त केली. (Kalicharan Maharaj)

पुण्यात मंडई येथील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट येथे प.पू. कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २८ रोजी) रात्री आरती झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर शिवसेना कुणाचीही असो शिवाजी महाराज हिंदूंचे त्यामुळे शिंदे सरकारला पाठिंबा असावे अशी इच्छा व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांना आता सल्ला देऊन काय फायदा, सल्ला देऊन आता काही उपयोग नाही. शिंदे सरकार चांगलं काम करत आहे. नव्या सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले त्यामुळे मला खूप आनंद झाला. हिंदूंच्या अस्मितेचा विजय होत आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासारखा राजा असणं गरजेचं आहे. शिंदे सरकार कायम रहावं, असे सरकार प्रत्येक प्रांतात असायला हवे. शिंदे सरकार सत्तेवर आले मला आनंद आहे, जे जे हिंदुत्ववादी सरकार आहे त्याला आमचा पाठींबा आहे.

हेही वाचा

Back to top button