गडचिरोली : ८० हजारांची लाच घेताना एसडीपीओ कार्यालयातील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

गडचिरोली : ८० हजारांची लाच घेताना एसडीपीओ कार्यालयातील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : अहेरीमार्गे भामरागड येथे अवैधरित्या दारू विक्री करू देण्यासाठी एका दारू विक्रेत्याकडून ८० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहेरी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील हवालदार मनोज कुनघाडकर (वय ३९) व खासगी इसम तिरुपती बोल्लेवार (वय ३२)यांना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

हवालदार मनोज कुनघाडकर याने तक्रारकर्त्यास एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती तो ८० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज, गुरुवारी कारवाई करण्यात आली.

हेही वाचलंत का?

Back to top button