पुणे : शाळेत सोडविण्यासाठी जात असताना टँकरच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू | पुढारी

पुणे : शाळेत सोडविण्यासाठी जात असताना टँकरच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू

पुणे : पुणे – सासवड रोड सातववाडी येथे वडील दुचाकीवर मुलीला शाळेत सोडवण्यासाठी जात असताना ट्रकने त्यांना जोरात धडक दिल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर समोर सातववाडी येथे झाला. नीलेश साळुंखे (वय ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या बाप लेकीची नावे आहेत. मीनाक्षी साळुंखे साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती.

आपल्या मुलीला शाळेत सोडवण्यासाठी निखिल साळुंखे फुरसुंगीहून हडपसरच्या दिशेने चालले होते. त्यावेळी सातववाडी येथे पाठीमागून आलेल्या ट्रकची धडक बसल्याने दुचाकीचालकाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला, बाजूला फेकल्या गेलेल्या मुलीला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना तिचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सकाळीच घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

सोलापूर : सराईत चाेरटा जाळ्यात, करमाळा पाेलिसांची कारवाई

बेळगाव : कारवारजवळ 26 लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

Back to top button