मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस; सरासरीच्या 43 टक्के अधिक; पाच वर्षांतील विक्रम मोडला | पुढारी

मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस; सरासरीच्या 43 टक्के अधिक; पाच वर्षांतील विक्रम मोडला

शिवाजी शिंदे; पुणे : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे राज्यात दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाड्यात आतापर्यंत जून-जुलैच्या सरासरीत 43 टक्के अधिक पाऊस पडला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या तिन्ही विभागांपेक्षा मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. राज्यात जून महिना कोरडाच गेला.

या महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या तिन्ही उपविभागांत पावसाने सरासरीपेक्षा अतिशय कमी हजेरी लावली. मात्र, मराठवाड्यात याच कालावधीत या तिन्ही उपविभागांपेक्षा 41 टक्के अधिक पाऊस पडला होता. राज्यात जूनमध्ये उणे 29 टक्के कमी पाऊस पडला होता. कोकणात उणे 28 टक्के, मध्य महाराष्ट्र उणे 38 टक्के, मराठवाड्यात 11 टक्के अधिक, तर विदर्भात उणे 39 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे राज्यात 36 पैकी 31 जिल्हे पावसाविना कोरडेठाक होते.

पाच जिल्ह्यांनी जूनची सरासरी ओलांडली होती. फक्‍त बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा 43 टक्के अधिक पाऊस झाला होता. बावीस जिल्हे रेड झोनमध्ये (अत्यल्प पाऊस), आठ जिल्हे यलो झोनमध्ये (अल्प पाऊस), तर पाच जिल्हे साधारण (ग्रीन झोन) पावसाचे होत राज्यात जूनमध्ये अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे असमान होते. त्यामुळे राज्याकडे समुद्राकडून बाष्पयुक्‍त वारे कमी प्रमाणात वाहत होते. जुलै महिन्याच्या दहा दिवसांत मराठवाड्यात कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव—ता अधिक असल्यामुळे इतर विभागांपेक्षा जास्त पावसाने हजेरी लावली. परिणामी, उर्वरित विभागांपेक्षा 43 टक्के अधिक पाऊस पडला आहे.

Back to top button