पाणी कपातीतून पुणेकरांना पुन्हा दिलासा; २६ जुलैपर्यंत नियमीत पाणी पुरवठा | पुढारी

पाणी कपातीतून पुणेकरांना पुन्हा दिलासा; २६ जुलैपर्यंत नियमीत पाणी पुरवठा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी कपातीतून पुणेकरांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. २६ जुलैपर्यंत नियमीतपणे पाणी पुरवठा सुरू राहणार असून त्यानंतर धरणांमधील पाणी साठ्याचा आढावा घेऊन कपातीचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

जुन महिन्यात पावसाने दांडी मारल्याने शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणांमधील पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे महापालिकेने दि. ४ जुलैपासून एक दिवसाआड पाणी कपात सुरू केली होती. चार दिवस पाणी कपात केल्यानंतर रविवारी आलेली आषाढी एकादशी आणि बकरी ईद लक्षात घेऊन ही कपात दि. ८ ते ११ जुलै या कालावधीसाठी ही पाणी कपात तुर्तास स्थगित करून दररोज पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता.

दरम्यान १२ जुलैपासून ही कपात पुन्हा सुरू न करता नियमीतपणे दररोज पाणी पुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट केले आहे. त्यानंतर धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही पावसकर यांनी स्पष्ट केले. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणांमधील पाणीसाठा रविवारी सायंकाळपर्यंत ८.१९ टिएमसीवर पोहचले आहे.

हेही वाचा

Back to top button