पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य प्रेरणादायी : कृषी आयुक्त धीरज कुमार | पुढारी

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य प्रेरणादायी : कृषी आयुक्त धीरज कुमार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्वगार कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी काढले. डॉ. पाटील यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन तळागाळातील शेतकर्‍याचे जीवन सुकर होण्यासाठी कृषी विभागाच्या योजना, तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नारळी पौर्णिमेस पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिवस हा राज्य सरकारच्या वतीने 2014 पासून शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.

रविवारी (दि.22) साखर संकुलच्या प्रांगणातील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास धीरज कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर साखर आयुक्तालयातील आत्मा सभागृहात आयोजित कार्यक्रमात कृषी आयुक्त बोलत होते.

यावेळी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे, कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) संचालक किसन मुळे, विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, कृषि गणेनचे उपायुक्त विनयकुमार आवटे, कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे अधिकारी उदय देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे व अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

विजय कानडे यांनी सूत्रसंचालन तर ज्ञानेश्वर बोटे यांनी आभार मानले.

हे ही वाचलत का :

कला क्षेत्रात अनेक चांगल्या संधी : लेखक अरविंद जगताप

Back to top button