पुणे : जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

पुणे : जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी करून 12 हजारांची लाच स्विकारणार्‍या औंध येथील जिल्हा रूग्णालयातील प्रशासकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकासह, सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

महादेव बाजीराव गिरी (52), डॉ. माधव बापूराव कनकवळे (50) आणि संजय सिताराम कडाळे (45) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. संशयीत आरोपी महादेव गिरी हा प्रशासकीय अधिकारी, डॉ माधव कनकवळे हा शल्यचिकित्सक तर संजय कडाळे तेथील लिपीक तसेच सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत आहे. त्यांच्याकडे सोनोग्राफी सेंटरच्या नुतनी करण्याचे काम सोपविण्यात आले होते. तक्रारदारांचे शिक्रापूर येथे सोनोग्राफी सेंटर आहे. या सोनोग्राफी सेंटरचे प्रमाणपत्राचे नुतनीकरण परवाना देण्यासाठी लिपीक संजय कडाळे याने गिरी आणि डॉ. कनकवळे यांच्यामार्फत 40 हजारांची लाचेची मागणी केली होती.

ठाणे : परिवहन समिती निवडणुकीला आयुक्तांची स्थगिती

तक्रादारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार 6 जून रोजी सापळा रचण्यात आला. याप्रकरणात 40 हजारांपैकी 12 हजारांची लाच स्विकारताना तिघांना अटक करण्यात आली. तिघांवरही सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, सहायक पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर, हवालदार नवनाथ वाळके, अंकुश माने, पांडुरंग माळी यांनी ही कारवाई केली.

संभाजीनगरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम; एमआयएमला दिला इशारा

Back to top button