पिंपरी : मेट्रो स्टेशनजवळ चार्जिंग पॉइंट

पिंपरी : मेट्रो स्टेशनजवळ चार्जिंग पॉइंट

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्टेशन परिसरात खासगी इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग पॉइंटची व्यवस्था महामेट्रोने केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना शुल्क भरून आपले वाहन सहजपणे चार्ज करता येणार आहे. शहरात फुगेवाडी ते पिंपरी अशी 5.8 किलोमीटर अंतर मेट्रो धावत आहे. सुटीच्या दिवशी मेट्रोला प्रवासांचा प्रतिसाद मिळत आहे.

प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रोने स्टेशनखाली पब्लिक बायसिकल शेअरींग सुरू केले आहे. मात्र, त्याला नागरिकांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. स्मार्ट मोबाईल व संबंधित सायकल कंपनीने अ‍ॅप असल्याशिवाय सायकलचा वापर करता येत नाही. तसेच, प्रवाशांच्या सोईसाठी महामेट्रोने स्टेशनखाली चार्जिंग पॉईट उभारले आहेत. फुगेवाडी, संत तुकारामनगर, पिंपरी या स्टेशनवर ती सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्या ठिकाणी वाहनचालकांना इलेक्ट्रिक वाहनाचे चार्जिंग करता येणार आहे. त्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. अद्याप, त्यास वाहनाचालकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news