खिडकीचे गज कापून सहा लाखांची चोरी | पुढारी

खिडकीचे गज कापून सहा लाखांची चोरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: भैरोबावस्ती कोलवडी येथील एका घरातून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने, असा 6 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी ही चोरी केली. याप्रकरणी सोमनाथ तुकाराम गायकवाड (वय 22, रा. भैरोबावस्ती, कोलोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 23 जून रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली आहे.

फिर्यादी गायकवाड हे व्यावसायिक आहेत. काही कामानिमित्त ते बाहेर गेले होते. त्यांच्या आई घराच्या किचनमध्ये झोपल्या होत्या.
त्या वेळी चोरट्यांनी गायकवाड यांच्या घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड आणि दागिन्यांची चोरी करून पळ काढला. फिर्यादी जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांंनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

हेही वाचा

गातजागागातजागा । प्रेममागाश्रीविठ्ठला ॥

महामार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता?

Back to top button