शाहू महाराजांचे काम पुढे नेणार, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांचे प्रतिपादन | पुढारी

शाहू महाराजांचे काम पुढे नेणार, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांचे प्रतिपादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व आजही कायम आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आठवायचे ते त्यांच्या कला, क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कामाबद्दल. आम्ही फक्त शाहूंना आठवत नाही, तर त्यांचे काम आम्हाला जमेल तसे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत,’ असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केले.

राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सवात ते बोलत होते. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप व समाजातील उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्ती आणि संघटनांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला.
समाजातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून शिष्यवृत्ती वाटप केली जाते.

या मला अटक करा, माझी मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही : संजय राऊत

मराठा सेवा संघाचे राजेंद्र दुबल, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन यशवंत भुजबळ, ज्ञानेश्वर मोळक, फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले, सचिव प्रशांत धुमाळ, अनिल माने, विराज तावरे, मंदार बहिरट उपस्थित होते. मारुती सातपुते, जागृती धर्माधिकारी, अजय फडोळ, रवींद्र मोहोळ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट रायगड व शिवजयंती महोत्सव समिती, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी खडकी या संस्थांना उत्कृष्ट ऐतिहासिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन सचिन जोशी, प्रदीप तांबे, मंदार बहिरट, नीलेश इंगवले, युवराज ढवळे, सौरभ भिलारे, संदीप खाटपे, रोहित ढमाले, नानासाहेब कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत जाधव यांनी केले.

Back to top button