विशुद्ध भारतीय संस्कारांची गरज; भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे मत | पुढारी

विशुद्ध भारतीय संस्कारांची गरज; भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘आज देशाला खर्‍या अर्थाने विशुद्ध भारतीय संस्कारांची गरज आहे. हे विचार घराघरांत पोहचले पाहिजेत,’ अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि ‘वंदे मातरम’ या महामंत्राचे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, प्रकृती केअर फाउंडेशनचे डॉ. ज्ञानोबा मुंडे आणि जटायु अक्षरसेवाचे संतोष जाधव विचारमंचावर होते.

देवधर पुढे म्हणाले, ‘मातृभाषेतून जे समजते ते अनुवादित साहित्यातून समजत नाही. त्यामुळे ॠषी बंकिमचंद्र यांच्यावर मराठी भाषेत आलेला ग्रंथ येणार्‍या पिढीवर संस्कार करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल.’ धनंजय कुलकर्णी, संतोष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. रवींद्र मिणियार यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम पाटील यांनी केले. अश्विनी चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता हिमानी नांदे यांनी गायलेल्या वंदे मातरमने झाली.

म्हणून पुणेरी पगडी घालूनच बोलणार
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुनील देवधर यांचा ‘ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी’ हा ग्रंथ आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. हा धागा पकडून देवधर म्हणाले, ‘शरद पवार यांना पुणेरी पगडी पाहिली की राग येतो, असे ऐकिवात आल्याने त्यांना खूप राग यावा म्हणून मी पूर्णवेळ पुणेरी पगडी घालूनच बोलणार आहे” असे त्यांनी सांगितले.

 हेही वाचा

सत्ताधार्‍यांचे सुकाणू उपद्व्यांपीकडे

सर्व रेल्वेगाड्यांमध्ये मिळेल बुधवारपासून जनरल तिकीट

सांगली : कुंपणावरील सदस्यांचे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

Back to top button