सत्ताधार्‍यांचे सुकाणू उपद्व्यांपीकडे

सुकाणू
सुकाणू

सांगली : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत प्रचाराचे शिवधनुष्य पेलत नाही, अशांना समितीने वितंडवाद करण्यासाठी पुढे केले आहे. उमेदवार आणि जिल्हा कार्यकारिणी यांच्यात बेबनाव, माजी संचालक नेतृत्वावर नाराज तर सत्ताधारी पॅनेलच्या प्रचाराचे सुकाणू उपदव्यापी, उपद्रवी लोकांकडे गेले आहे. द्वेषाने भारलेले हे प्रचारक सत्ताधार्‍यांच्या सत्तेची होडी बुडविण्यात महत्त्वाची भूमिका निभावतील, अशी टीका महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार यांनी केली.

ते म्हणाले, स्वाभिमानी पॅनेलमध्ये अनेक प्रतिभावान शिक्षक सत्ताधार्‍यांविरोधात एकवटले आहेत. सत्ताधार्‍यांची 12 वर्षांतील मनमानी चव्हाट्यावर आली आहे. सभासदांच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याची धमक त्यांच्या नेत्याकडे नाही. त्यांचे पदाधिकारी प्रचारापासून अलिप्त आहेत. माजी संचालक नैराश्याने पछाडलेले आहेत. असे अभ्यासहीन लोक चुकीचे मुद्दे रेटत आहेत. सत्ताधार्‍यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यांचे प्रचारकच सत्ताधार्‍यांच्या सत्तेची होडी बुडवतील.

ते म्हणाले, स्वाभिमानी पॅनेलच्या सात संचालकांनी गेल्या सात वर्षांपासून सत्ताधार्‍यांचे मुखवटे वेळोवेळी फाडले आहेत. लेखा परीक्षणातील त्रुटी समोर आणत उघडे पाडले आहे. स्वाभिमानी मंडळाने अभ्यासू, प्रतिभावान सभासदांच्या बळावर प्रचारात आघाडी घेतलेली आहे. मात्र, सत्ताधार्‍यांकडून द्वेषाचे समाजकारण केले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news