दोन दुचाकीचोर जेरबंद; वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई | पुढारी

दोन दुचाकीचोर जेरबंद; वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

बारामती : पुढारी वृत्तसेवा: वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघा दुचाकीचोरांना अटक केली. सोमनाथ अशोक कुंभार (रा. दत्तवाडी, पुणे; सध्या रा. ढाकाळे, ता. बारामती) व शुभम दशरथ चाळेकर (रा. गणेश कॉलनी, दत्तनगर, जांभूळवाडी रोड, कात्रज, पुणे) अशी या चोरट्यांची नावे आहेत. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत होळ गावच्या हद्दीत नऊ फाटा येथून दि. 21 जून रोजी एका व्यक्तीच्या राहत्या घरासमोरून मध्यरात्री दुचाकी चोरीला गेली होती.

त्यांनी याबाबत वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, सहायक फौजदार दीपक वारुळे, हवालदार राहुल भाग्यवंत, हृदयनाथ देवकर, रूपेश साळुंखे, पोपट नाळे, अमोल भुजबळ, नितीन साळवे, राहुल भाग्यवंत आदींनी या गुन्ह्याचा तपास केला. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. त्यांच्याकडे गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी हडपसरमधून चोरून आणल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय त्यांच्याकडे कोयता, दोन मोबाईल, बनावट आधार कार्ड मिळून आले. त्यांनी हे मोबाईल शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) व लोणी काळभोर येथून चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; नागरिकांची यादी पाहण्यासाठी झुंबड

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : रामदास आठवले

धक्कादायक! पतीनं हात बांधून चौथ्या मजल्यावरून फेकून दिलं, महिला ब्लॉगरचा मृत्यू

Back to top button