जेजुरी नवीन पालखीतळाला अधिकार्‍यांची भेट | पुढारी

जेजुरी नवीन पालखीतळाला अधिकार्‍यांची भेट

जेजुरी : येथील माउलींच्या मुक्काम पालखीतळाची पाहणी पुरंदरचे आ. संजय जगताप यांच्यासह अधिकार्‍यांनी केली. यावेळी त्यांनी पालखी सोहळ्याला कोणतीही कमतरता भासू नये याची काळजी घेण्याच्या सूचना जेजुरी नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. आ. संजय जगताप यांच्या पुढाकाराने जेजुरीत होळकर तलावाजवळ नऊ एकर जागा पालखी मुक्काम तळासाठी उपलब्ध करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने ती जागा ताब्यात घेऊन यावर्षीपासून या ठिकाणी पालखीचा मुक्काम होणार आहे.

सोहळ्याच्या मुक्काम तळाचे सुशोभीकरण हे सोहळ्यानंतर सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी येत्या रविवारी (दि. 26) सोहळा जेजुरीस मुक्कामाला येत आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी सोहळ्याला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. जागेचे सपाटीकरण, मुरुमीकरण, पुरेशी विजेची सोय, पाणीपुरवठा सुविधा आदी कामे सुरू आहेत. गुरुवारी दुपारी 1 वाजता आ. संजय जगताप यांनी या ठिकाणी येऊन तळाची पाहणी केली.

यावेळी तहसीलदार रूपाली सरनोबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र पाटील, जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, महावितरणचे जेजुरी शाखा अभियंता संदीप काकडे, जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, रुख्मिणी जगताप, गटनेते सचिन सोनवणे, अजिंक्य जगताप, बाळासाहेब दरेकर, बाळासाहेब सातभाई, रमेश बयास, पालिका कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कामाचा आढावा घेतला. मुरुमीकरण, रस्त्यावरील खड्डे, विजेची व पाण्याची करण्यात येणारी सुविधा, स्वछतातागृहे आदीबाबत माहिती घेतली.

हेही वाचा

कोल्हापूर : शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी

पुरंदर प्रशासनाकडून सोहळ्याची तयारी पूर्ण; आ. संजय जगताप यांची माहिती

धरणगाव दिंडीला नगरजवळ अपघात अज्ञात वाहनाची जेऊर शिवारात धडक

Back to top button