

पुणे : पुढारी वृत्तसेवा: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणारे, उत्सुकतेने शनिवारवाड्याच्या भेटीला आलेले अन् सारसबागेत फिरायला आलेले वारकरी…असे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, श्री दत्तमंदिर, पासोड्या विठ्ठल मंदिर आदी ठिकाणी दर्शनासाठी वारकर्यांची गर्दी पाहायला मिळाली. अनेक वारकर्यांनी शनिवारवाडा, सारसबाग आदी ठिकाणी भेट दिली. तसेच, अनेकांनी शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ठिकाणी तर तुफान गर्दी पाहायला मिळाली. याविषयी वारकरी आनंद वाघमारे म्हणाले, की मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. खूप आनंद झाला. पालखी मुक्कामी असल्याने दिवसभर पुण्यात फिरण्याचा आनंद घेतला. तसेच, खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गेलो होतो.
हेही वाचा