पळसदेव परिसरात रिमझिम पाऊस | पुढारी

पळसदेव परिसरात रिमझिम पाऊस

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा: पळसदेव (ता. इंदापूर) परिसरात बुधवारी (दि. 22) तब्बल 4 ते 5 तास रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता व परिसरातील खड्डे व डबकी पाण्याने भरून वाहत असल्याचे दिसत होते. पळसदेव परिसरात 31 मे च्या मध्यरात्री दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे या वर्षी वेळेत पाऊस पडून शेतकर्‍यांच्या पेरण्याही वेळेत होतील, अशी अपेक्षा येथील शेतकर्‍यांना होती.

मात्र, 25 ते 26 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वातावरणात काळेकुट्ट ढग दाटून आले होते. मात्र, पाऊस इंदापूर व करमाळा तालुक्यातील खादगाव जिंती या परिसरात पडत असल्याचे दिसत होते. नंतर मात्र परिसरातदेखील रिमझिम पाऊस बरसण्यास सुरवात झाली, तो रात्री 11 वाजेपर्यंत चालू होता.

उन्हाळी हंगामातील भुईमुग व कांदा काढणीचे कामे चालू असून, ते झाकण्यासाठी शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली. दरम्यान, सध्या पडत असलेल्या पावसामुळे काही होणार नाही. आणखी दमदार पाऊस सातत्याने पडण्याची आवश्यकता आहे. तरच शेतकर्‍यांना खरिपातील पुढील कामे करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा

सलमानने केले वृक्षारोपण

जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी; चाकण परिसरात दमदार पाऊस

गोड्या पाण्यातील सर्वात मोठा मासा

Back to top button