ई-बाईक गेल्या कुणीकडे; मेट्रो स्थानकांवरील ई-बाईक गायब झाल्याने पुणेकरांचा सवाल | पुढारी

ई-बाईक गेल्या कुणीकडे; मेट्रो स्थानकांवरील ई-बाईक गायब झाल्याने पुणेकरांचा सवाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा: मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या फीडरसेवेसाठी गरवारे ते वनाज यादरम्यानच्या मेट्रो स्थानकावर ई-बाईकची व्यवस्था केली होती. मात्र, सध्या या ई-बाईकच गायब झाल्या आहेत. कुठे गेल्या या ई-बाईक, की प्रशासनाने फक्त पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठीच त्या आणल्या होत्या, असा प्रश्न पुणेकर नागरिकांना पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्या वेळी मेट्रो प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी केली होती. या वेळी झेंडूच्या फुलांनी मेट्रो स्थानके सजली होती. स्थानकाखाली प्रवाशांच्या फीडरसेवेसाठी ई-बाईक ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या कालांतराने हळूहळू गायब झाल्या आहेत. आता एकही ई-बाईक मेट्रो स्थानकावर पाहायला मिळत नाही.

त्यामुळे मेट्रो प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मेट्रोतून उतरल्यावर प्रवाशांना निश्चित स्थळी जाऊन येण्यासाठी मेट्रो प्रशासनाने स्थानकाखालीच ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून काही तासांकरिताचे पैसे ऑनलाइन पेड केल्यानंतर प्रवाशांना या ई-बाईकचा लाभ घेता येणार होता. परंतु, आता या ई-बाईकच स्थानकांवर नाहीत.

मेट्रो स्थानकांवरील ई-बाईकचे काम आम्ही एका खासगी कंपनीला दिले आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार आणि प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार ते या ठिकाणी प्रवाशांना ई-बाईक उपलब्ध करून देतात.

                        – हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

हेही वाचा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान

सातारा : ऐन पावसाळ्यात सहकाराचे रणांगण तापले

कोल्हापूर : बनावट सोने तारण ठेवून पाच लाखांची फसवणूक

Back to top button