राहू : पुढारी वृत्तसेवा: श्री क्षेत्र संगम वाळकी (ता. दौंड) येथील संतराज महाराज संस्थानच्या आषाढी वारीसाठी पालखीचा रथ नंदू-माणिक ही बैलजोडी ओढणार आहे. पिंपळगाव (ता. दौंड) येथील प्रगतशील बागायतदार खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष नारायण रामचंद्र जगताप यांना या वर्षी बैलजोडी पालखीरथास जुंपण्याचा मान या वर्षी संस्थानच्या विश्वस्तांनी दिला. बैलजोडी खिलार जातीची, पांढरीशुभ्रव रुबाबदार आहे.
ही बैलजोडी बोरगाव येथील प्रगतशील बागातदार सुरेश ताकवणे यांच्याकडून जगताप यांनी घेतली आहे. बैलजोडीचे पूजन संतराज महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी केले. या वेळी संस्थानचे अध्यक्ष सुरेशमहाराज साठे म्हणाले की, पालखी सोहळ्याचे 54 वे वर्ष असून, या वर्षी सोहळा 24 जून रोजी पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, राणीताई शेळके, माजी उपसभापती नितीन दोरगे, झुंबर गायकवाड, सयाजी ताकवणे, श्यामभाऊ जगताप, सुभाष बोत्रे, के. खाडे, संजय थोरात, शिवाजी वाघोले आदींसह संतराज देवस्थान समितीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा