पिंपरी : घातक शस्त्र बाळगणार्‍या दोघांना अटक | पुढारी

पिंपरी : घातक शस्त्र बाळगणार्‍या दोघांना अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा; घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन कोयते आणि एक तलवार जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 17) गावजत्रा मैदान भोसरी आणि किवळे येथे या कारवाई करण्यात आली. ओंकार बाळासाहेब भोगाडे (24, रा. आळंदी रोड, भोसरी) याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई स्वामी विठ्ठल नरवडे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सोबत शस्त्र बाळगत असून तो गावजत्रा मैदान भोसरी येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी रचून ओंकार याला अटक केली. त्याच्याकडून 200 रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे. ओंकार भोगाडे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 28 डिसेंबर 2021 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आला होता. तपास भोसरी पोलिस करीत आहेत.दुसर्‍या कारवाईत विरोधी पथकाने किवळे येथील मराठी शाळेसमोर शंतनू उर्फ पप्पू सुनील म्हसुडगे (22, रा. किवळे) याला अटक केली. त्याच्याकडून एक कोयता आणि एक तलवार जप्त करण्यात आली आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

 हेही वाचा

खेलो इंडिया : ऑलिम्पिकसाठी पायाभरणी

हार्दिक पंड्या म्हणाला, धोनीचा सल्ला लक्षात ठेवूनच खेळतो

शाहिद आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर संतापला

Back to top button