पिंपरी : निगडी येथील बधिर-मूक विद्यालयातील मानसी विश्वकर्मा आणि राजश्री कराळे यांनी परिस्थितीवर मात करीत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. मानसीने 80 टक्के गुण मिळवून पहिला, तर राजश्रीने 79. 80 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
मानसी हिचे वडील सुतार काम करतात. मानसी हुशार मुलगी असून घरातील सर्व जबाबदारी आणि घरकाम करून तिने हे यश प्राप्त केल्याचे पालक सांगतात. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामध्ये सुरुवातीला आलेल्या अडचणी यामुळे झालेले नुकसान शिक्षणासाठी बाधा ठरत होते.
मूकबधिर विद्यार्थ्यांना सर्व सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने अध्यापन करावे लागते. ऑनलाइन व्हिडीओव्दारे शिकणे अवघड होते. पण तरीही त्यावर मात करत पहिला क्रमांक मिळविला असे तिचे वडील सागर विश्वकर्मा यांनी सांगितले. राजश्रीला आई-वडील नसल्याने तिचा सांभाळ आजोबा आणि मावशी हे करतात.
राजश्रीला घरातील सर्व कामे सांभाळून तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही या सर्वांवर मात करत ती शिक्षण घेत आहे. दहावीचे वर्ष असताना तिने मध्यरात्रीपर्यंत जागून अभ्यास केला. आई वडील नसल्याने लहान वयातच घरच्या कामाची जबाबदारी सांभाळून राजश्री शिक्षण घेत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करत तिने हे यश मिळविले आह