पिंपरी : स्पा सेंटरवर छापा; दोन महिलांची सुटका | पुढारी

पिंपरी : स्पा सेंटरवर छापा; दोन महिलांची सुटका

पिंपरी : स्पा सेंटरवर छापा मारून पोलिसांनी दोन महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली. ही कारवाई बुधवारी (दि. 16) शंकर कलाटेनगरमधील प्रेस्टीन स्क्वेअर मॉल येथे करण्यात आली. निखिल जयवंत जाधव (26, रा. पिंपळे सौदागर), रॉबिन अब्राहम (वय 35, रा. वाकड) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मतदान’ वैचारिकता हरवतेय ‘मतविक्री’त

याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेस्टीन स्क्वेअर मॉल मधील द सेरेने स्पा येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. या कारवाईत दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. आरोपींनी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. या कारवाईत पोलिसांनी 10 हजार 30 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button