पिंपरी : पालिकेच्या चार कर्मचार्‍यांवर कारवाई | पुढारी

पिंपरी : पालिकेच्या चार कर्मचार्‍यांवर कारवाई

पिंपरी : जातीचा दाखला बोगस दिल्याचे स्पष्ट झाल्याने महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांवर, तर आवश्यक साधने न वापरता नालेसफाई केल्याबद्दल तसेच तब्बल 1 हजार 333 दिवस गैरहजर राहिल्याबद्दल आणखी दोन कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा आयुक्त राजेश पाटील यांनी उगारला आहे.

मजूर असलेल्या सचिन परदेशी यांनी अनुसुचित जातीचे जात प्रमाणपत्र दिले होते. पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सांगून ते प्रमाणपत्र जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मजूर नीलेश बिर्दा याचेही अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस आढळले आहे. या दोन्ही कर्मचार्‍यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्या दोघांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.

मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी : संजय राऊत

सफाई कामगार सीताराम कसाळे यांची प्लॉगेथॉन मोहिमेसाठी नेमणूक केली होती; मात्र ते कोणतेही साधने व गणवेश न घालता नालेसफाई करीत असल्याची तक्रार छायाचित्रासह पालिकेस प्राप्त झाली होती. पालिका सफाई कामगारांसाठी गणवेश, रेनकोट, गमबूट, स्कार्फ व इतर साहित्यांची रक्कम थेट कर्मचार्‍यांच्या खात्यावर जमा करते.

तर, मास्क, सॅनिटायझर, हॅण्ड गोल्व्ज, साबण आदी सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले जाते. दिलेले कामकाज सोडून इतर ठिकाणी काम करून गैरवर्तन केल्याने त्याची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे; तसेच विनापरवाना तब्बल 1 हजार 333 दिवस गैरहजर राहिल्याबद्दल मजूर अभिजीत कापसे याची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Back to top button