शुभम जाधवला 35 टक्के; सर्व विषयांत 35 टक्के मिळाल्याने चर्चा | पुढारी

शुभम जाधवला 35 टक्के; सर्व विषयांत 35 टक्के मिळाल्याने चर्चा

पुणे : दहावीच्या निकालात राज्यातील 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. मात्र, सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती न्यु इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत शिकून 35 टक्के मिळवणार्‍या शुभम जाधव या विद्यार्थ्याची. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या सहाही विषयांत त्याला 35 गुण मिळाले आहेत. शुभम पुण्यातील गंजपेठेत राहतो.

त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. तो हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. दरमहा त्याला सहा हजार रुपये पगार मिळतो. वडील पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम करतात, तर आई केअर टेकर म्हणून काम करते. नवव्या वर्गात त्याला 67 टक्के मार्क पडले होते. दहावीत त्याने सगळ्या विषयाचा अभ्यास केला होता.

जास्त मार्क मिळतील, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र, त्याला कमी मार्क मिळाले. निकाल पाहिल्यानंतर त्याला सर्वच विषयांत 35 मार्क मिळाल्याचे दिसले. त्याच्या मित्रांना मात्र जास्त मार्क मिळाले. त्यामुळे शुभमचा नाराजीचा सूर आहे.

हेही वाचा

आयुष इनामदार ‘शंभर नंबरी’; पुणे शहरात पहिला; सर्व विषयांत 100 टक्के

नाशिक : चणकापूर धरणातून बिगरसिंचन आवर्तन, पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा बंद

सातारा : सिव्हिल बनलंय यंत्रचोरीचा अड्डा

Back to top button