पुणे विभागात पोरी हुश्शार; दहावी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.73 टक्के | पुढारी

पुणे विभागात पोरी हुश्शार; दहावी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.73 टक्के

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे विभागाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून, विद्यार्थिनी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.73 टक्के, तर मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.33 टक्के आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 2.04 टक्क्यांनी अधिक आहे. पुणे जिल्ह्यातून 1 लाख 33 हजार 930 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या 1 लाख 32 हजार 847 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 28 हजार 567 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे जिल्ह्याचा निकाल 96.77 टक्के लागला.

नगर जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या 69 हजार 505 विद्यार्थ्यांपैकी 68 हजार 901 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 66 हजार 549 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नगर जिल्ह्याचा निकाल 96.58 टक्के आहे. सोलापूर जिल्ह्यातील 65 हजार 253 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या 64 हजार 652 विद्यार्थ्यांपैकी 63 हजार 196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सोलापूर जिल्ह्याने 97.74 टक्क्यांसह पुणे विभागात अग्रस्थान प्राप्त केले. पुणे विभागातील पाच विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण, तर 13 हजार 133 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. दरम्यान, 2020 चा दहावीचा पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के इतका लागला होता. त्यात यंदा 0.38 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.

व्हिडिओ व्हायरल : केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड कॅमेरामनसाठी ठरले देवदूत, वाचवले प्राण

विभागात 13 हजारांवर विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण…

पुणे विभागात 5 विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मळाले आहेत. तर 13 हजार 133 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 24 हजार 978 विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्के, 34 हजार 43 विद्यार्थ्यांना 80 ते 85 टक्के, 37 हजार 312 विद्यार्थ्यांना 75 ते 80 टक्के, 35 हजार 880 विद्यार्थ्यांना 70 ते 75 टक्के, 31 हजार 919 विद्यार्थ्यांना 65 ते 70 टक्के, 29 हजार 957 विद्यार्थ्यांना 60 ते 65 टक्के, 46 हजार 214 विद्यार्थ्यांना 45 ते 60 टक्के आणि 12 हजार 181 विद्यार्थ्यांना 45 टक्क्यांहून कमी गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हानिहाय निकाल
पुणे 96.77%
अहमदनगर 96.58%
सोलापूर 97.74%
एकूण 96.96%
उत्तीर्ण विद्यार्थी
पुणे 1 लाख 28567
अहमदनगर 66 हजार 549
सोलापूर 63 हजार 196

तालुकानिहाय निकाल
आंबेगाव 98.28%
बारामती 97.71%
भोर 99.44%
दौंड 96.78%
हवेली 95.12%
इंदापूर 97.49%
जुन्नर 97.54%
खेड 96.33%
मावळ 97.64%
मुळशी 96.22%
पुणे शहर पश्चिम 96.24%
पुरंदर 99.05%
शिरूर 96.75%
वेल्हा 97.29%
पुणे शहर पूर्व 96.12%

हेही वाचा

पिंपरी : फोटो व्हायरलची धमकी देत महिलेवर अत्याचार

Nashik Zilla Parishad : बांधकाम, लेखाच्या मतभेदात इमारतीचे रखडले बांधकाम

खानापूर तालुक्यात लोंढा परिसरात आज-उद्या वीज खंडित

Back to top button