पिंपरी : फोटो व्हायरलची धमकी देत महिलेवर अत्याचार

पिंपरी : फोटो व्हायरलची धमकी देत महिलेवर अत्याचार
Published on
Updated on

पिंपरी : अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले; तसेच महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे उकळले. ही घटना 8 मे 2017 ते 16 जून 2022 या कालावधीत तळवडे आणि चिंचवड येथे घडली. सलीमुद्दीन अलिमुद्दीन खान (32, रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या उत्तर प्रदेश येथील मूळगावी नातेवाईकाच्या लग्नासाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्यांची आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीकडे वारंवार पैशांची मागणी केली. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या ओळखीतून आरोपीने फिर्यादींसोबत सेल्फी फोटो काढला. तो फोटो फिर्यादीच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन सन 2019 मध्ये तळवडे येथे महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

तसेच लैंगिक अत्याचार करताना आरोपीने व्हिडीओ रेकॉर्ड केला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच, फिर्यादीकडून आरोपीने पैसेही घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news