जात वैधताफसाठी अर्ज करण्याचे आवाहन | पुढारी

जात वैधताफसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणार्‍या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही, त्यांनी तात्काळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते. प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीमार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा

Rajinikanth : रजनीकांत मोठा धमाका करणार, Jailer चित्रपटाचे पोस्टर रिलीज

रत्नागिरी : त्यांनी पुसला ‘नॉन मॅट्रिक’चा शिक्का

निपाणी शहराला भविष्यात पाणी टंचाईची भीती; विजय जाधव यांचा दावा

Back to top button