श्रीनाथ म्हस्कोबा कार्यस्थळावर विविध उपक्रमांचे आयोजन | पुढारी

श्रीनाथ म्हस्कोबा कार्यस्थळावर विविध उपक्रमांचे आयोजन

राहू, पुढारी वृत्तसेवा: श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पाटेठाण
(ता. दौंड) येथील श्रीनाथ कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजप नेते माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सीबीजी गॅस प्रकल्प व विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात येणार आहे. यानिमित्त कारखाना कार्यस्थळावर उपस्थित राहण्याचे आवाहन सभासद व शेतकरी बांधवांना कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. सन 2020-21 च्या गाळप हंगामाची एफआरपीची रक्कम कारखान्याने अदा केली आहे.

हेही वाचा

पंढरपुरात मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी

कापड खरेदी व्यवहारात 18 लाखांची फसवणूक

सोलापूर विद्यापीठाला ‘ऑक्सफर्ड’कडून निमंत्रण

Back to top button