

वाकड : पुढारी वृत्तसेवा : भूमकर चौकाशेजारील डीपी बॉक्सचे झाकण तुटले असल्यामुळे पावसाळ्यामध्ये शॉर्टसर्किट होऊन अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर डीपीची दुरुस्त करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
भूमकर चौकातून कात्रज बाह्यवळणाकडे जाण्यासाठी बायपासवर हा डीपी असून पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे. डीपीमधून लाईटच्या वायर बाहेर आलेले आहेत. हा रस्ता कायम रहदारीचा असून, पावसाच्या पाण्यामध्ये त्याचा करंट उतरला तर मोठा अनर्थ होण्याचा धोका आहे. डीपी शेजारुन लहान मुले शाळेला जातात. तसेच, आसपास अनेक दुकाने असल्यामुळे लवकरात लवकर डीपी दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.