

पिंपरी : शिवशाही बसमध्ये धुळे ते नाशिक फाटा असा प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील दोन लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 9 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नाशिक फाटा येथे उघडकीस आली.
याप्रकरणी मंगला देविदास पवार (60, रा. रावलनगर, शिंदखेडा, धुळे) यांनी मंगळवारी (दि. 14) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला व त्यांचे पती शिवशाही बसने प्रवास करीत होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेले दोन लाख 88 हजार रुपये किमतीचे 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.