पिंपरी :हाऊसिंग सोसायटीच्या ड्रेनेजलाइनसाठी महापालिकेचा खर्च | पुढारी

पिंपरी :हाऊसिंग सोसायटीच्या ड्रेनेजलाइनसाठी महापालिकेचा खर्च

 

पिंपरी : पिंपळे निलख येथील रक्षक हाऊसिंग सोसायटीची ड्रेनेजलाइन महापालिकेच्या ड्रेनेजलाइनला जोडलेली नाही. त्यासाठी संरक्षण विभागाच्या जागेतून ड्रेनेजलाइन टाकावी लागणार आहे. त्याकरीता पालिका 16 लाख 48 हजार 500 रूपये शुल्क संरक्षण विभागास देणार आहे.

रक्षक हाऊसिंग सोसायटीची ड्रेनेजलाइन पालिकेच्या ड्रेनेजलाइनला जोडावी, अशी विनंती सोसायटीच्या अध्यक्षाने पालिकेकडे केली होती. त्यासाठी संरक्षण विभागाच्या 700 मीटर लांबीची ड्रेनेज लाइन टाकणे आवश्यक होते. पालिकेने नवी दिल्लीच्या केंद्रीय संरक्षण विभागाच्या सहसचिव कार्यालयाकडे 29 ऑक्टोबर 2021 ला अर्ज केला.

त्याप्रमाणे 2 मार्च 2022 ला परवानगी मिळाली. काम सुरू करण्यापूर्वी अनामत सुरक्षा रक्कम 16 लाख 48 हजार 500 रूपये संरक्षण खात्याकडे जमा करण्यास सांगण्यात आले. त्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली.

Back to top button