संविधानाच्या गाभ्यातूनच शोषणमुक्त समाजाची निर्मिती; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत | पुढारी

संविधानाच्या गाभ्यातूनच शोषणमुक्त समाजाची निर्मिती; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत

पुणे : ’शोषणमुक्त समाजाची रचना संविधानाच्या गाभ्यात रुजली पाहिजे. तेव्हाच संविधाननिष्ठ संस्कृतीची निर्मिती आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

मातंग साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या एका पुस्तकावरील चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. अंबादास सगट, डॉ. सुनील भंडगे, डॉ. शिवाजीराव हुसे, डॉ. पी. डी. साबळे, भास्कर नेटके आदी उपस्थित होते. डॉ. सबनीस म्हणाले, ’आरक्षण हे उपकार नव्हे! पण त्याचा लाभ सर्व वंचितांना व्हायला हवा. समाजातील अंतरद्वंद्व जवळ शिल्लक ठेवून संस्कृतीचा विकास कठीण असतो. समाजव्यवस्थेतील कुरूपता व भेदभावना घातक ठरते. आजही समाज हा जाती-धर्मामध्ये विखुरला गेलेला आहे. ज्याप्रमाणे विविध राजकीय पक्ष हे सत्तेसाठी एकत्र येतात, आता समाजाने किमान सत्यासाठी तर एकत्र आले पाहिजे.

आजाराचे वेळेत निदान न झाल्याने युवकाचा मृत्यू

’ डॉ. हुसे आणि नेटके यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सौरभ पवार यांचा सन्मान करण्यात आला. समारोपाला बाबासाहेब जाधव आणि डॉ. गंगाधर रासगे यांनी शाहिरी गायनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. डॉ. धनंजय भिसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. उज्ज्वला हातागळे यांनी आभार मानले, तर शिवाजी पौळ, प्रा. विनोद सूर्यवंशी, अदित्य भिसे, मनीष भालके, भगवान पवार आदींनी संयोजन केले.

Back to top button