सलग सुट्ट्यांमुळे मावळ तालुक्यात मोठी गर्दी, पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी | पुढारी

सलग सुट्ट्यांमुळे मावळ तालुक्यात मोठी गर्दी, पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा: शनिवार, रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे मावळ तालुक्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. महत्त्वाच्या पर्यटनस्थळी पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी दिसून आली. मावळ तालुका अलीकडच्या काळात पर्यटन तालुका म्हणून नावारूपाला येत असून पुणे, मुंबई, ठाणे परिसरातील पर्यटक येथे सलग सुट्ट्या आल्यास धाव घेत असतात.

भाज्या महागल्याने कडधान्यांवर भिस्त

मावळ तालुक्यात खंडाळा, लोणावळा व परिसरात तसेच कार्ला, भाजे, पवनाधरण परिसर या पर्यटनस्थळी शनिवार-रविवार पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. याशिवाय तुंग, तिकोना, लोहगड, कार्ला, भाजे, घोरावाडी डोंगर या ठिकाणांची गड-किल्ल्यावर रविवारी मोठी गर्दी झाली होती.

पुन्हा अनुभवला शिवराज्याभिषेक; 125 वर्षांपूर्वीचा इतिहास नाट्यरूपात सादर

तर प्रति शिर्डी शिरगाव, एकवीरादेवी या धार्मिकस्थळी देखील मोठी गर्दी आणि वाहनांची वाहतूक कोंडी झाली होती.
प्रचंड संख्येने पर्यटक आल्याने पर्यटनावर अवलंबून असणारे व्यावसायिकांचा चांगला धंदा झालेला आहे. चहा, वडापाव, चायनीज पदार्थ, घरगुती खानावळी, हॉटेल व्यावसायिकांकडे प्रचंड गर्दी आढळून येत होती. तर पुणे-मुंबई महामार्गावरील धाब्यावर ही प्रचंड गर्दी आढळून येत होती. पुण्या-मुंबईहून एक दिवसा करता पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा या गर्दी मध्ये मोठा
समावेश होता.

Back to top button