पुन्हा अनुभवला शिवराज्याभिषेक; 125 वर्षांपूर्वीचा इतिहास नाट्यरूपात सादर | पुढारी

पुन्हा अनुभवला शिवराज्याभिषेक; 125 वर्षांपूर्वीचा इतिहास नाट्यरूपात सादर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: तब्बल 125 वर्षांपूर्वी प्रमाणे स्वातंत्र्यवीरांच्या वेशात कलाकारांनी सहभागी होत ऐतिहासिक अशा लकडी पूल विठ्ठल मंदिरातील शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम पुन्हा एकदा नाट्यरूपाने सादर केला. तो प्रसंग पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

शिवराज्याभिषेकाचे महत्त्व आपण जाणून घेतले पाहिजे, कारण असंख्य शतकांनंतर हिंदूंचे सिंहासन रायगडावर निर्माण झाले. अशा शब्दांत लोकमान्य टिळकांनी स्वराज्य व स्वातंत्र्यप्राप्तीकरिता चेतना जागविणारे केलेले भाषण आणि ’घ्यावे लागतसे शिवाजी बाजी परी हे मस्तक हातावरी, हे जाणोनी तरी आता सुजनहो घ्या खड्ग ढाला हाती…’ अशा शब्दांत चापेकर बंधूंनी सादर केलेले काव्य पुणेकरांनी प्रत्यक्षपणे अनुभविले. दि 12 जून 1897 रोजी पुण्यातील लकडी पूल विठ्ठल मंदिरात शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम झाला होता.

पुणे :मान्सूनची आगेकूच सुरूच

त्याच सभेचे इतिहासप्रेमी मंडळातर्फे त्याच मंदिरात नाट्यरूपाने 125 वर्षांनी पुन्हा एकदा सादरीकरण केले. या वेळी इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप काळभोर, दीपक थोरात, दिलीप बांदल, बाळासाहेब ताटे, महेश अंबिके उपस्थित होते. इतिहासप्रेमी मंडळातर्फे लोकमान्य टिळकांची भूमिका अ‍ॅड. अभिजित देशमुख, दामोदर चापेकर यांची भूमिका भूषण पाठक, यांसह कुणाल कांबळे, कार्तिक बहिरट, राज दीक्षित, पायस पारखे यांनी भूमिका साकारल्या.

शेटे म्हणाले, ”लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनदेखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रेरणा दिली. लकडी पूल विठ्ठल मंदिरात शिवराज्याभिषेकानिमित्त झालेली सभा ऐतिहासिक ठरली.” या ऐतिहासिक प्रसंगाचे पुन्हा एकदा सादरीकरण करुन स्वातंत्र्यवीरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन या वेळी केले.

हेही वाचा 

‘शेतकर्‍यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा’ : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले

22 प्रकारची पदे कंत्राटी पद्धतीने; ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुसूत्रता आणून गुणवत्ता सुधारणार

बळीराजाचे डोळे आभाळाकडे ; पाऊस मात्र रूसलेलाच !

Back to top button