पुणे :मान्सूनची आगेकूच सुरूच | पुढारी

पुणे :मान्सूनची आगेकूच सुरूच

पुणे : पुढारी वृत्तसेवा
मान्सून शनिवारी मुंबई, पुण्यात पोहोचला. आता तो उर्वरित मध्य महाराष्ट्र काबीज करून मराठवाड्याच्या दिशेने निघाला आहे. आगामी 48 तासांत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र गाठेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. 16 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दिशेने वाटचाल

अनुकूल वातावरणामुळे मान्सूनची तीन दिवसांपासून आगेकूच सुरू आहे. रविवारी मात्र काही भागांत त्याने विश्रांती घेतली. गुरुवारपर्यंत तो संपूर्ण राज्यात पोहोचण्याच्या दिशेने प्रवास करीत आहे. मुंबई-पुण्यात त्याने जोरदार हजेरी लावल्याने पुढील चार दिवसांत राज्यातील विविध भागांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. सध्या मान्सूनची उत्तरी सीमा डहाणू ते पुणे शहरावरून जात आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते दक्षिण कर्नाटकपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे तो मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागाकडे अधिक प्रगती करेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने रविवारी वर्तविला आहे.

  • कोकण : मुसळधार
  • मध्य महाराष्ट्र : हलका ते मध्यम
  • मराठवाडा : तुरळक
  • विदर्भ : तुरळक

 

Back to top button